प. बंगालमध्ये बोट बुडून तिघांचा मृत्यू; 65 बेपत्ता

वृत्तसंस्था
बुधवार, 26 एप्रिल 2017

कोलकता- पश्चिम बंगालमध्ये असलेल्या हुगली जिल्ह्यातील भद्रेश्वर येथे बोट पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला असून, 65 जण बेपत्ता आहेत, अशी माहिती पोलिस अधिकाऱयांनी आज (बुधवार) दिली.

पोलिस अधिक्षक सुकेश जैन यांनी सांगितले की, भद्रेश्वर येथे एका बोटीमधून नागरिक जात होते. बोटीमध्ये वजन जास्त झाल्यामुळे ती एका बाजूने बुडाली. नागरिकांनी जीव वाचविण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या. यावेळी तीन जणांचा मृत्यू झाला. पाण्यामध्ये अद्यापही 65 जण बेपत्ता आहेत. या नागरिकांचा शोध घेणे सुरू आहे.

काही नागरिकांना जखमी अवस्थेत पाण्याबाहेर काढण्यात आले आहे. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये दोन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. अपघातग्रस्त नागरिक हे परागन्स जिल्ह्यातील श्यामनगर येथील असल्याचे समजते. पश्चिम बंगालमधील दोन मंत्र्यांसह विविध अधिकारी घटनास्थळी लक्ष ठेवून आहेत, असेही जैन यांनी सांगितले.

Web Title: Jetty submerges in water in Hooghly river, 3 dead, 65 missing