
दागिन्यांनी सजलेल्या दुकानात आता कांदे, बटाटेंसह भाजीपाला दिसू लागल्यानंतर ग्राहकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण, लॉकडाऊनदरम्यानही दुकान सुरूच ठेवल्याने सोनाराने संधीचे सोने केले आहे.
दागिन्यांनी सजलेल्या दुकानात दिसताहेत कांदे, बटाटे...
जयपूर (राजस्थान) : दागिन्यांनी सजलेल्या दुकानात आता कांदे, बटाटेंसह भाजीपाला दिसू लागल्यानंतर ग्राहकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण, लॉकडाऊनदरम्यानही दुकान सुरूच ठेवल्याने सोनाराने संधीचे सोने केले आहे.
Video: एवढी मोठी रांग कशासाठी असेल बरं...
जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. यामुळे व्यवसाय ठप्प झाला. अनेक दुकाने बंद झाली. पण, येथील एका सोनाराने सोनाराचा व्यवसाय बाजूला करत भाजीपाला व्यवसाय सुरू केला आणि ग्राहकांचाही मोठा प्रतिसाद मिळाला. हुकुमचंद सोनी असे सोनाराचे नाव आहे.
दारूड्याने सापाला धमकावले अन् तोडले लचके...
हुकुमचंद सोनी हे रामनगर परिसरात गेली 25 वर्ष सराफाचे काम करतात. दुकान दागिन्यांनी सजले होते. शिवाय, दुकानाचा चांगला जम बसलेला आहे. हक्काचे अनेक गिऱहाईक होते. दुकानातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत होती. पण, लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे दुकान बंद ठेवावे लागले. यामुळे भाजीपाला विकण्याचा निर्णय घेतला. प्रसारमाध्यमांशी बोलताना सोनी म्हणाले, लॉकडाऊनमुळे दुकान बंद झाल्यामुळे घरात बसण्याशिवाय पर्याय नव्हता. एवढे दिवस घरात बसून करणार काय? म्हणून भाजीपाला विकण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांपासून भाजीपाला विकत असून, नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नागरिक नियमांचे पालन करून खरेदीसाठी येतात. यामुळे चार पैसे मिळत असून, घरखर्चही चालत आहे.'
Web Title: Jeweller Selling Vegetables Due Lockdown Inspiration Jaipur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..