esakal | Video: एवढी मोठी रांग कशासाठी असेल बरं...
sakal

बोलून बातमी शोधा

long queue out side in liquor shop at chittor video viral

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनदरम्यान अनेकजण विविध ठिकाणी अडकून पडले असून, खाण्यासाठी पदार्थ मिळत नसल्यामुळे अनेकांचे हाल होत आहेत.

Video: एवढी मोठी रांग कशासाठी असेल बरं...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

चित्तूर (आंध्र प्रदेश): जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनदरम्यान अनेकजण विविध ठिकाणी अडकून पडले असून, खाण्यासाठी पदार्थ मिळत नसल्यामुळे अनेकांचे हाल होत आहेत. पण, अन्न मिळविण्यापेक्षा तळीरामांना दारू जास्त प्रिय असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

Video: दारूड्याने सापाला धमकावले अन् तोडले लचके...

देशभरात 17 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. मात्र, राज्य सरकारने या काळात थोडी शिथिलता आणताना दारूची दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली. दारूची दुकाने सुरू झाल्यापासून मोठ-मोठ्या रांगा दिसत आहेत. सोशल मीडियावर रागांची छायाचित्रे, व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. सध्या आंध्र प्रदेशातील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडीओ पाहून एवढी मोठी रांग दारूसाठी असेल यावर विश्वास बसत नाही. रांगेदरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही नियम पाळलेले दिसत नाहीत. रांगेत धक्काबुक्की चाललेली दिसते. यावेळी पोलिसही उपस्थित असल्याचे दिसत आहे. चित्तूरमधील हे दृश्य पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे.

दरम्यान, केरळ आणि मध्य प्रदेशातील दारूची दुकान अद्याप बंद ठेवण्यात आलेली आहेत. गोव्यातील दुकाने सोमवार पासून सुरू करण्यात आली आहेत. पण, तेथे मास्क नाही तर दारू नाही, अशी युक्ती वापरण्यात आली. कर्नाटकातील काही भागातील दारूची दुकान सुरू झाल्यावर तळीरामांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे या ठिकाणी दारूच्या दुकानांसमोर गर्दी दिसत आहे. तमिळनाडू सरकारने 7 मे पासून दारूची दुकाने सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र रेड झोनमधील दारूची दुकाने सुरू करण्याच्या शक्‍यतेला सरकारने नकार दिला आहे.

दारूचा खंबा हातात पडला अन् लागला की...

loading image