Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

आलमगीर यांनी राजकीय कारकीर्दीची सुरुवात सरपंच पदापासून केली होती. वर्ष २००० मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी चारवेळा बाजी मारली आहे. ईडीने केलेल्या कारवाईनंतर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

नवी दिल्लीः आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने रांची येथे धाड मारुन तब्बल ३० कोटी रुपये जप्त केले आहेत. झारखंड सरकारचे मंत्री आलमगीर आलम यांच्या खासगी सचिवांच्या नोकराच्या घरात ही रक्काम सापडली आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांना सुरुवातीला ३० कोटी रुपये सापडले होते. त्यानंतर आणखी तीन कोटी रुपये सापडले आहेत. मंत्री आलम यांच्या मंत्रालयात भ्रष्टाचार सुरु असल्याचे इनपुट्स ईडीला मिळाले होते. त्यानंतरच ईडीने खासगी सचिवाच्या नोकाराच्या घरी छापेमारी केली.

ज्या नोकराला महिन्याला १५ हजार रुपये पगार मिळतो त्याच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर कॅश असेल, याचा अंदाज ईडीच्या अधिकाऱ्यांना नव्हता. त्यामुळे अधिकाऱ्यांनी नोटा मोजण्याची मशिन आणि आणखी काही कर्मचाऱ्यांना बोलावून घेतलं.

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?
मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

१० हजार रुपयांच्या लाचेचं प्रकरण

ईडीने मागच्याच वर्षी मे महिन्यात चिफ इंजिनिअरकडे १० हजारांच्या लाचेच्या प्रकरणात रेड टाकली होती. त्यावेळी त्यांचा जबाब नोंदवला गेला. ते म्हणाले की, मंत्र्यांकडे लाचेचा पैसा पोहोच केला जातो. त्यानंतर झारखंडचे ग्रामविकास मंत्री आलमगीर आलम यांचं नाव पहिल्यांचा पुढे आलेलं होतं. तपासणीमध्ये आलमगीर यांचे खासगी सचिव संजीव लाल यांचंही नाव पुढे आलं. आता तर संजीव लाल यांच्या घरात काम करणाऱ्या नोकराकडे ३० कोटींपेक्षा जास्त रक्कम सापडली आहे.

आलमगीर आलम हे पाकुड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. ते तब्बल चारवेळा या निवडून आलेले आहेत. सध्या त्यांच्याकडे झारखंड सरकारमध्ये संसदी कार्य आणि ग्रामीण विकास मंत्रालयाचा कार्यभार आहे. यापूर्वी ते २० ऑक्टोबर २००६ ते १२ डिसेंबर २००९ या दरम्यान झारखंड विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत.

आलमगीर यांनी राजकीय कारकीर्दीची सुरुवात सरपंच पदापासून केली होती. वर्ष २००० मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी चारवेळा बाजी मारली आहे. ईडीने केलेल्या कारवाईनंतर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com