दिव्यांग मुलावरून पतीशी व्हायचा वाद! आईने ६ वर्षांच्या चिमुकल्याला केले थेट मगरीच्या हवाली

कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यातील दांडेली तालुक्यात एका 26 वर्षीय महिलेने आपल्या पतीसोबत झालेल्या भांडणानंतर आपल्या सहा वर्षाच्या दिव्यांग मुलाला मगरीने बाधित नदीत फेकून दिले. पोलिसांनी ही माहिती दिली.
Mother throws 6-year-old son into river after quarrel with husband in Karnataka-
Mother throws 6-year-old son into river after quarrel with husband in Karnataka-esakal

कर्नाटकात मानवतेला धक्का देणारी घटना समोर आली आहे. आईच्या प्रेमावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. आईने स्वत:च्या मुलाला मगरी नदीत फेकून दिले. दांडेली तालुक्यातील एका 26 वर्षीय महिलेने तिच्या पतीसोबत झालेल्या जोरदार वादानंतर आपल्या सहा वर्षांच्या बोलण्यात अक्षम मुलाला नदीत फेकून दिले. या जोडप्याला दोन वर्षांचा मुलगाही आहे, त्यांच्या मोठ्या मुलाच्या प्रकृतीवरून वारंवार वाद होत होते.

कर्नाटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोठा मुलगा दिव्यांग असल्यामुळे पती आणि पत्नीमध्ये सतत भांडण होत होते. जन्मापासून मुलाला बोलता येत नव्हते. त्याला आणखी दोन वर्षांचा मुलगाही आहे.

आरोपी आई सावित्रीचा 27 वर्षीय पती रवी कुमार आपल्या मोठ्या मुलाच्या अपंगत्वावरून अनेकदा तिच्याशी भांडत असे आणि तिने अशा मुलाला जन्म का दिला असा प्रश्न केला. कधीकधी तो कथितपणे 'मुलाला फेकून दे' असेही म्हणत होता.

Mother throws 6-year-old son into river after quarrel with husband in Karnataka-
Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

दरम्यान गेल्या शनिवारी याच मुद्द्यावरून सावित्रीचे पतीसोबत पुन्हा भांडण झाले, त्यामुळे तिने आपल्या मोठ्या मुलाला मगरी असलेल्या नदीत फेकून दिले. शेजाऱ्यांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली, पोलिस घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत उशीर झाला होता. अंधार असल्यामुळे मुलाचा शोध घेता आला नाही.

त्यानंतर रविवारी सकाळी मुलाचा मृतदेह सापडला. त्याच्या अंगावर गंभीर जखमा, चाव्याच्या खुणा होत्या आणि त्याचा एक हात गायब होता. यावरून मगरीने मुलाची शिकार केल्याचे दिसून येते. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

पोलिसांनी सांगितले की, आम्ही गुन्हा दाखल करून पती-पत्नीला अटक केली आहे.

Mother throws 6-year-old son into river after quarrel with husband in Karnataka-
Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com