
मुंबईमध्ये एका मॉडेलच्या बलात्कार प्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे.
रांची- मुंबईमध्ये एका मॉडेलच्या बलात्कार प्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. हेमंत सोरेन यांच्यावरील बलात्काराच्या आरोपानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप नेत्यांनी सातत्याने ट्विट करत हेमंत सोरेन यांच्यावर वार केला आहे.
हरियाणातील भाजप नेता अरुण यादव यांनी ट्विट करत काँग्रेसला प्रश्न विचारले आहेत. काँग्रेस अल्पसंख्याकांचा तारणहार असल्याचं दाखवते. पण आता त्यांच्या मुख्यमंत्र्यावरच बलात्काराचा आरोप होते आहे, अशावेळी काँग्रेस काय करणार, असा सवाल त्यांनी केला आहे.
घरात घुसून 22 वर्षीय तरुणीचे अपहरण; मुख्यमंत्र्यांनी गाठलं पोलिस मुख्यालय
भाजप नेते विकास प्रीतम सिन्हा यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी इतिहास रचला आहे, असा इतिहास ज्याच्या जवळपास कोणी जाऊ शकत नाही. राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे, तरीही ते खूर्चीवर बसलेले आहेत. हेमंत यांची नैतिकता आणि आत्मा मरुन गेली आहे. त्यांच्या या पापामध्ये काँग्रेस नेते राहुल, प्रियांका गांधी हेही भागिदार आहेत.
काय आहे प्रकरण?
राष्ट्रीय महिला आयोगाने 2013 साली एका मॉडेलवर झालेल्या कथित बलात्काराप्रकरणी महाराष्ट्र पोलिस महासंचालक यांना पत्र लिहिलं आहे. मॉडेलवरील बलात्काराप्रकरणी सीएम हेमंत सोरेन आणि सुरेश नागरे यांचं नाव घेण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 2013 मध्ये हेमंत सोरेन आणि सुरेश नागरे यांनी मॉडेलवर बलात्कार केला होता. तसेच मॉडेलच्या कुटुंबीयांना याबाबत वाच्यता न करण्यासाठी धमकी दिली होती.
शेतकऱ्यांच्या विश्वासाचं बियाणं करतंय दरवर्षी सहाशे कोटींची उलाढाल, महाबीजचा...
पीडित मॉडेलचे पत्र व्हायरल
पत्रामध्ये दावा करण्यात आलाय की, 2013 मध्ये सुरेश नागरेने मॉडेलला काही लोकांसोबत भेटवण्यालाठी हॉटेलमध्ये बोलावलं होतं. तेथे हेमंत सोरेन यांच्यासह 3 लोक उपस्थित होते. हॉटेलमध्ये मॉडेलवर बलात्कार करण्यात आला. मॉडेल याप्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये पोहचली, तेव्हा पोलिसांनी तिची तक्रार दाखल करुन घेतली नाही.