Jharkhand Crime News : झारखंडमध्ये आठवड्यात तिसरा बलात्कार

झारखंडमध्ये अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. दुमका आणि पलामूनंतर आता राज्यातील गढवा जिल्ह्यात एका महिलेवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
झारखंडमध्ये आठवड्यात तिसरा बलात्कार
झारखंडमध्ये आठवड्यात तिसरा बलात्कारSakal

गढवा (झारखंड) : झारखंडमध्ये अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. दुमका आणि पलामूनंतर आता राज्यातील गढवा जिल्ह्यात एका महिलेवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

यावेळी पीडितेला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. मात्र तिने धाडस दाखवून आरोपीच्या तावडीतून शिताफीने पळ काढला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीला अटक करण्यात आली. पीडितेचा पती व आरोपी जहिरुद्दीन अन्सारी हे गुजरातमध्ये एका कारखान्यात काम करत होते. काही दिवसांपूर्वी पीडितेच्या पतीने अन्सारीला ४५ हजारांचे कर्ज दिले होते. त्यानंतर तो गुजरातहून गढवा येथे आला होता.

जहिरुद्दीनने कर्जाचे पैसे परत करण्याच्या निमित्ताने महिलेला बोलावले. यासाठी ती पैसे घेण्यासाठी पाटण्याहून रेल्वेने बन्सीधरनगर येथे पोचली. तिने जहिरुद्दीनला फोन केला असता घरी पैसे देतो, असे सांगितले.

त्यानुसार महिलेला घरी घेऊन जात असताना त्याने बेलपहाडी येथे तिच्यावर बलात्कार केला. यावेळी त्याने तिला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने धाडस दाखवत जीव वाचवला आणि पीडितेने फोनद्वारे पोलिसांना माहिती कळविली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com