

Wild elephant herd in Jharkhand’s Hazaribagh district after a tragic midnight attack that claimed six lives in Gondwar village.
esakal
Elephant Attack in Jharkhand: झारखंडमधील हजारीबागमध्ये हत्तींनी कहर केला आहे. गुरुवारी रात्री १२:०० ते १:०० वाजेच्या दरम्यान दारू वनक्षेत्रातील चर्चू ब्लॉक अंतर्गत येणाऱ्या गोंडवार गावातील नानहुतोंगरी टोला येथे हत्तींच्या कळपाने कहर केला. पाच जंगली हत्तींनी एकाच कुटुंबातील चार जणांसह सहा जणांना पायदळी तुडवून ठार मारले. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. झारखंडमध्ये मागील काही दिवसांत हत्तींच्या हल्ल्यात २३ बळी गेले आहेत.