Crime: वस्तू खरेदीसाठी दुकानात गेली, तिथेच ६ नराधमांची वाकडी नजर पडली अन्...; अल्पवयीन मुलीसोबत ३ दिवस नको ते घडलं

Pakur minor girl hostage: एका १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्काराचा एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. सहा आरोपींनी मुलीला तीन दिवस बंदी बनवून ठेवले आणि तिच्यावर बलात्कार केला.
Pakur minor girl hostage

Pakur minor girl hostage

ESakal

Updated on

झारखंडमधील पाकूर जिल्ह्यात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसर हादरून गेला. सहा आरोपींनी अल्पवयीन मुलीला तीन दिवस बंदी बनवून ठेवले. नंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही घटना जिल्ह्यातील मालपहारी ओपी पोलीस स्टेशन परिसरात घडली. पोलिसांनी सहा आरोपींपैकी तिघांना अटक केली आहे. इतरांचा शोध घेत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com