नाग चावायला आला; मद्यधुंद व्यक्तीनं त्यालाच कच्चं खाल्लं, नंतर दुसरा सापही गिळला, तिसऱ्याला खायला गेला तेवढ्यात...

Man Swallowed Snakes News: झारखंडच्या छत्रा जिल्ह्यात बुधन भारती याने दारूच्या नशेत, त्याला चावण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सापाला जिवंत चावले आणि नंतर शेतातील दुसरा मेलेला साप खाल्ला.
Man Swallowed Snakes

Man Swallowed Snakes

ESakal

Updated on

उत्तर प्रदेश आणि बिहारनंतर आता झारखंडमधील छत्रा जिल्ह्यातील कुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरवाडीह टोला येथे वेडेपणाचे एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. शनिवारी, दारूच्या नशेत असलेल्या एका ४६ वर्षीय व्यक्तीने एक नव्हे तर दोन साप खाल्ले. सध्या त्या व्यक्तीवर रुग्णालयात गंभीर अवस्थेत उपचार सुरू आहेत. ही विचित्र घटना छत्रा येथील बरवाडीह टोला गावात घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com