पलामू : झारखंडच्या पलामू जिल्ह्यात पोलिस दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या (Jharkhand Encounter) भीषण चकमकीत दोन जवान शहीद झाले असून एक जवान जखमी झाला आहे. शहीद जवानांची नावे संतन कुमार मेहता आणि सुनील राम अशी असून, जखमी जवानाचे नाव रोहित कुमार आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तो धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.