RJD Candidate Arrested : उमेदवारी अर्ज दाखल करताच 'राजद'च्या उमेदवारास झारखंड पोलिसांनी केली अटक!

RJD candidate arrested by Jharkhand Police : तब्बल २१ वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात ही अटक झाली आहे, तर समर्थकांमध्ये तीव्र संताप
Jharkhand Police arrest RJD candidate immediately after nomination filing, creating political uproar ahead of elections.

Jharkhand Police arrest RJD candidate immediately after nomination filing, creating political uproar ahead of elections.

esakal

Updated on

RJD Candidate Arrested Soon After Filing Nomination :बिहारमध्ये सध्या निवडणुकी रणधुमाळी सुरू आहे. दररोज नवनवीन राजकीय घडामोडी घडत आहेत. आता रोहतासमधील सासाराम विधानसभा मतदारसंघातील राजदच्या  उमेदवारास झारखंड पोलिसांनी अटक केल्याचे समोर आले आहे.

राजद उमेदवार सत्येंद्र साह हे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. यावेळी ते निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनातून बाहेर पडताच त्यांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्येंद्र साह यांना न्यायालयात हजर केल्यानंतर तुरुंगात पाठवण्यात येणार आहे.

आरजेडी उमेदवार सत्येंद्र साह यांच्या अटकेबाबत,  पोलिस आयुक्तांनी माहिती दिली आहे. कारगहर पोलीस ठाण्याने त्यांना सुमारे २१ वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात जारी केलेल्या न्यायालयीन वॉरंटच्या आधारे अटक केली आहे. २००४ मध्ये झारखंडमधील गढवा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये गढवा न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध कायमस्वरूपी वॉरंट जारी केले होते.

Jharkhand Police arrest RJD candidate immediately after nomination filing, creating political uproar ahead of elections.
Diwali festival : भारतात एक राज्य असंही जिथं आजही बहुतांश लोक दिवाळीच करत नाहीत साजरी, कारण...

पोलिसांनी केलेल्या अटकेबाबत, आरजेडी उमेदवार सत्येंद्र साह यांनी हे त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांचे षड्यंत्र असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की न्यायालयीन वॉरंट असूनही, त्यांना निवडणुकीपूर्वी अटक करण्यात आली नव्हती. मात्र, जेव्हा राष्ट्रीय जनता दलाने त्यांना उमेदवार म्हणून घोषित केले तेव्हा त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी त्यांना अटक करण्याचा कट रचला तर र सत्येंद्र साह यांच्या अटकेमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com