

Electricity Bill Hike
ESakal
Electricity Bill Hike: झारखंडमधील लाखो वीज ग्राहकांना महागाईचा आणखी एक फटका बसला आहे. झारखंड राज्य वीज नियामक आयोगाने २०२६-२७ या वर्षासाठी नवीन वीज दरांना मंजुरी दिली आहे. झारखंड बिजली वितरण निगम लिमिटेडच्या प्रस्तावावर विचार करून आयोगाने सरासरी ६.१२ टक्के दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन दर १ एप्रिल २०२६ पासून लागू होतील.