पंतप्रधान मोदी यांना जिग्नेश मेवानी म्हणाले 'नमक-हराम'!

Jignesh Mevani
Jignesh Mevani

अहमदाबाद : वादग्रस्त नेते आणि वडगामचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख 'नमक हराम' असा केल्याने वादंग निर्माण झाले आहे. मेवानी भाजप आणि मोदी यांचे कट्टर विरोधक आहेत.मेवानी यांनी वापरलेल्या भाषेमुळे पुन्हा एकदा ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मेवानी यांनी नऊ मिनिटांत सहा वेळा मोदी यांचा उल्लेख 'नमक-हराम' असा केला. 

उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या मजुरांवर गुजरातमध्ये काही ठिकाणी हल्ले झाले. त्यामुळे परप्रांतिय मजुरांना गुजरात सोडून जाणे भाग पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. याचा उल्लेख मेवानी यांनी सभेतील भाषणात केला आणि 'पंतप्रधान मोदी यांनी या परिस्थितीची दखल घेतली नाही' असा आरोपही केला. 

या भाषणामध्ये मेवानी म्हणाले, "उत्तर प्रदेश आणि बिहारमधील मजुरांना मारहाण झाली. दहा-बारा दिवस हे प्रकार घडत राहिले. पण या नमक-हरामाने तोंडातून एक शब्दही उच्चारला नाही. परप्रांतियांविरोधातील हिंसाचार थांबविण्याविषयी पंतप्रधानांनी गुजराती नागरिकांना एका ओळीचेही आवाहन केले नाही. त्यांनी काहीही वक्तव्य केलेले नाही. म्हणूनच या नमक-हरामाला ओळखा..! किंबहुना, हा त्या नमक-हरामाचाच कट असू शकतो.'' 

इतक्‍यावरच न थांबता मेवानी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविषयी पुन्हा अशीच भाषा वापरली. 'मोदी यांची नमक-हरामी सर्वांत जास्त आम्ही इथे गुजरातमध्येच अनुभवली आहे. त्यामुळे मी गुजरातच्या सर्व जनतेच्या वतीने बिहार आणि उत्तर प्रदेशच्या जनतेची माफी मागतो', असेही मेवानी म्हणाले. 

यापूर्वीही मेवानी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर अशाच भाषेत टीका केली होती. 'सर्जिकल स्ट्राईक'चा उल्लेख करून 'याहीपेक्षा भयानक सर्जिकल स्ट्राईक मोदी यांनी देशावरच केला आहे', असे वक्तव्य मेवानी यांनी काही महिन्यांपूर्वी केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com