Loksabha 2019: 'चुनाव का महिना, राफेल करे शोर' आव्हाडांची मोदींवर गाण्यातून टीका (व्हिडिओ)

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राफेल प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर गाण्याच्या माध्यमातून टीका केली आहे. विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: गाणं गात पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं आहे.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राफेल प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर गाण्याच्या माध्यमातून टीका केली आहे. विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: गाणं गात पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं आहे.

'सावन का महिना पवन करे शोर' या मिलन चित्रपटातील गाण्याच्या चालीवर 'चुनाव का महिना' हे गाणं त्यांनी गायलं आहे. या गाण्याचा एक व्हिडीओ आव्हाड यांनी सोशल मिडियावर प्रसिद्ध केला आहे. 'सावन का महिना पवन करे शोर' या मूळ गाण्यातील शब्दांमध्ये त्यांनी थोडा बदल करून 'चुनाव का महिना' हे नवीन गाणं तयार केलं आहे.

आव्हाड यांनी हातात गिटार घेऊन हे गाणं गाताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदी आणि भाजपावर राफेल मुद्द्यावरुन त्यांनी पहिल्या कडव्यात टीका केली आहे. त्यानंतर मोदी आणि नवाज शरीफ यांची पाकिस्तानमध्ये भेट झाली होती. त्यांच्या या भेटीवरुन आव्हाड यांनी दुसऱ्या कडव्यामध्ये मोदींना टोला लगावला आहे. तर शेवटच्या कडव्यामध्ये नोटबंदीवरुन जितेंद्र आव्हाड यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.

Web Title: jitendra awhad sung a song on narendra modi