2018-19 च्या तुलनेत यंदा दहशतवादाचा बिमोड करण्यात लक्षणीय यश; घुसखोरीच्या घटनाही घटल्या

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 December 2020

पाकिस्तानकडून पुष्कळवेळा प्रयत्न करुनही गेल्या तीन-चार वर्षांच्या तुलनेत यावर्षी भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी यशस्वी होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.

जम्मू-काश्मीर : आतापर्यंत 3,500 पोलिस कर्मचारी हे कोरोना संक्रमित सापडले असून यातील बरेच कर्मचारी हे बरे देखील झाले आहेत. यापैकी आतापर्यंत 15 पोलिसांनी कोरोना काळात कर्तव्य बजावताना संक्रमित होऊन प्राण गमावले आहेत. तसेच 2018 आणि 2019 या दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी दहशतवादाशी निगडीत घटनांमध्ये घट झाली आहे.याबाबतची माहिती जम्मू आणि काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिली आहे. ते आज जम्मू-काश्मीरमधील पोलिसांच्या कामगिरीविषयी पत्रकारांशी बोलत होते.

पाकिस्तानकडून पुष्कळवेळा प्रयत्न करुनही गेल्या तीन-चार वर्षांच्या तुलनेत यावर्षी भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी यशस्वी होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. त्यामुळे घुसखोरांना स्थानिक दहशतवाद्यांवर अवलंबून रहावे लागले. आणि त्यांनी ड्रोनद्वारे शस्त्रे, स्फोटक साहित्य आणि रोख रक्कम पुरवण्याचा प्रयत्न केला. पण यातील बऱ्याच प्रयत्नांना निष्फळ करत आपण या कुटील कारवाया कमी केल्या आहेत.

हेही वाचा - वर्षाचा शेवटचा दिवस हा कोविड योद्ध्यांच्या स्मरणासाठी; PM मोदींच्या हस्ते AIIMS चा शुभारंभ

 

2019 च्या तुलनेत लोकांनी दहशतवाद्यांशी हातमिळवणी करणाऱ्या आकड्यांमध्ये काहीशी वाढ झाली आहे. मात्र, सकारात्मक बाब अशी आहे की, यातील 70 टक्के लोकांना एकतर आपण मारलं आहे की त्यांना अटक केली गेलीय. एकूणात दहशतवाद्यांचे उपद्रवी आयुष्यच आपण कमी केलं आहे. जम्मू भागात डझनभर दहशतवादी कार्यरत होते. सध्या हा आकडा अवघ्या तीनवर पोहोचला आहे. ते किश्तवर जिल्ह्यात आहेत आणि आम्ही त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: J&K DGP Dilbag Singh said significant decline in terrorist related incidents this year in comparison to 2018 and 2019