बारामुल्लात चकमकीत दोन दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

या चकमकीनंतर परिसरात सुरक्षा रक्षकांकडून शोधमोहिम राबविण्यात आली. या दोन्ही दहशतवाद्यांचा कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंध आहे, हे स्पष्ट झालेले नाही.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात आज (शनिवार) सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामुल्ला जिल्ह्यातील पहलगाम भागातील आवुरा गावात दोन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. दहशतवाद्यांचा शोध सुरु असताना त्यांच्याकडून गोळीबार करण्यात आला. प्रत्युत्तरादाखल करण्यात आलेल्या गोळीबारात दोन्ही दहशतवादी ठार झाले आहेत. यांच्याकडून एक एके-47 रायफल आणि एक पिस्तुल जप्त करण्यात आली आहे.

या चकमकीनंतर परिसरात सुरक्षा रक्षकांकडून शोधमोहिम राबविण्यात आली. या दोन्ही दहशतवाद्यांचा कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंध आहे, हे स्पष्ट झालेले नाही. यांची अद्याप ओळखही पटलेली नाही. पोलिस आणि 53 राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी ही संयुक्त मोहिम राबविली.

Web Title: J&K: Security forces kill two terrorists killed in Baramulla