JNU Attack: पोलिसांनी डाव्यांवरच ठेवला ठपका; आईशी घोषसह नऊ जणांची नावे जाहीर

सकाळ न्यूज नेटवर्क  
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

आईषी घोषचे दावे 

  • मी काहीही चुकीचे केलेले नसून, पोलिसांना घाबरत नाही  
  • कायद्याच्या बाजूने आम्ही ठाम, लोकशाही मार्गाने चळवळ पुढे नेऊ 

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यापीठातील हिंसाचारामुळे आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या ठाकलेल्या दिल्ली पोलिसांनी आज अखेर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. या प्रकरणी नऊ संशयितांची ओळख पटविताना त्यांनी "जेएनयूएसयू'ची अध्यक्षा आईशी घोषवर हिंसाचाराचा ठपका ठेवल्याने नव्या वादाला तोंड फुटू शकते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्ली पोलिसांनी आज संशयितांची सीसीटीव्ही छायाचित्रे माध्यमांसमोर मांडली. यामध्ये "जेएनयूएसयू'ची अध्यक्षा आईशी घोष हिच्यासह चुनचुन कुमार, पंकज मिश्रा, वासकर विजय, सुचेता तालुकराज, प्रिया रंजन, दोलन सावंत, योगेंद्र भारद्वाज, विकास पटेल यांचा समावेश आहे. हिंसाचारप्रकरणी आत्तापर्यंत तीन गुन्हे दाखल झाले असून, अद्याप कोणत्याही संशयिताला अटक करण्यात आलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

आईषी घोषचे दावे 

  • मी काहीही चुकीचे केलेले नसून, पोलिसांना घाबरत नाही  
  • कायद्याच्या बाजूने आम्ही ठाम, लोकशाही मार्गाने चळवळ पुढे नेऊ 
  • पोलिसांनी माझ्याविरोधातील पुरावे सार्वजनिक करावेत 
  • माझ्यावरील हल्ल्याचे पुरावे मी सादर करू शकते 
  • मी कोणावरही हल्ला केलेला नसून, पोलिसांचे आरोप खोटे 

आणखी वाचा - स्मृती इराणींचे दीपिका पदुकोनला थेट आव्हान 

सरकार नरमले
हिंसाचारानंतर केंद्र सरकारने अखेर आज नमते घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या सचिवांनी विद्यापीठाचे कुलगुरू आणि विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. या चर्चेमध्ये विद्यार्थ्यांकडून वाढीव शुल्क न घेण्यावर, तसेच हिवाळी सत्राच्या नोंदणीला मुदतवाढ देण्यावर सहमती झाली आहे. दरम्यान, विद्यार्थी मात्र कुलगुरू हटाओच्या मागणीवर ठाम आहेत. केंद्रीय शिक्षण सचिव अमित खरे यांनी कुलगुरू एम. जगदीशकुमार यांना बोलावून घेत, तसेच जेएनयूतील विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींशीही चर्चा केली. यात "जेएनयूएसयू'ची अध्यक्षा आईशी घोष हिचाही समावेश होता. या भेटीनंतर कुलगुरू जगदीशकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना विद्यापीठात स्थिती सुधारल्याचा दावा केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jnu attack suspected student leader aishi ghosh raised five points