JNU attack : स्वराला अश्रू अनावर, तर बॉलिवूड कलाकार म्हणतात...

वृत्तसंस्था
सोमवार, 6 जानेवारी 2020

जेएनयूमध्ये रविवारी रात्री काही मुखवटाधारी गुंडांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोष हिच्यासह अठरा जण गंभीर जखमी झाले आहेत.

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयु) विद्यार्थ्यांवर गुंडांनी केलेल्या हल्ल्याचा देशभरातून निषेध होत असताना, प्रमुख बॉलिवूड कलाकारांनी आपले मत व्यक्त केले आहे. तर, अभिनेत्री स्वरा भास्करला याविषयी बोलताना अश्रू अनावर झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जेएनयूमध्ये रविवारी रात्री काही मुखवटाधारी गुंडांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोष हिच्यासह अठरा जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा देशभरातून विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि तज्ज्ञांनी कठोर शब्दांत निषेध करण्यात येत आहे. तापसी पन्नू, अनुराग कश्यप, शबाना आझमी, रितेश देशमुख, कृती सेनन यांसह प्रमुख अभिनेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

JNU attack : जेएनयूतील हल्ल्यावर शरद पवार, आदित्य ठाकरे म्हणाले...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: JNU attack Swara Bhasker Taapsee Pannu and other Bollywood celebs react on the violence