JNU attack : जेएनयूतील हल्ल्यावर शरद पवार, आदित्य ठाकरे म्हणाले...

वृत्तसंस्था
Monday, 6 January 2020

काही मुखवटाधारी गुंडांनी जेएनयूतील विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ले केले यामध्ये काही जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या देशाचे नियंत्रण फॅसिस्ट शक्तींच्या हाती असल्याने ते शूर विद्यार्थ्यांच्या आवाजाला घाबरतात. आज विद्यापीठात झालेल्या हिंसाचारातून त्यांच्या भीतीचे प्रतिबिंब उमटते. 
- राहुल गांधी, नेते कॉंग्रेस 

नवी दिल्ली : विविध प्रकारच्या आंदोलनांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये (जेएनयू) रविवारी रात्री पुन्हा एकदा हिंसाचाराचा भडका देशभर उडला असून, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मत व्यक्त केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काही मुखवटाधारी गुंडांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोष हिच्यासह अठरा जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा देशभरातून विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि तज्ज्ञांनी कठोर शब्दांत निषेध करण्यात येत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हिपी) कार्यकर्त्यांनीच नियोजनबद्ध पद्धतीने हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप डाव्या विद्यार्थी संघटनांनी केला आहे.

#JNU : 'जेएनयू'मध्ये पुन्हा राडा; विद्यार्थी संघटनेची प्रमुख जखमी

याविषया ट्विट करत शरद पवार म्हणाले, की जेएनयूतील विद्यार्थी व प्राध्यापकांवर झालेला हा हल्ला नियोजित होता. लोकशाहीसाठी घातक अशी ही घटना असून, याचा मी निषेध करतो. लोकशाही मूल्य आणि विचारांना हिंसाचाराने चिरडण्याचा प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाही.

तर, आदित्य ठाकरे म्हणाले, की जेएनयूतील घटनेचा निषेध. जामिया, जेएनयू तसेच अन्य कॅम्पसमधील युवकांची अस्वस्थता चिंताजनक आहे. विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या गुंडांवर कडक कारवाई झाली पाहिजे. वेळेत यांच्यावर करवाई करून विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे. 

#JNUViolence : 'जेएनयू'ची धग पोचली पुण्यात; 'एफटीआयआय'समोर विद्यार्थ्यांची निदर्शने!

जेएनयूमधील हिंसाचाराची घटना समजल्यानंतर मला धक्काच बसला, विद्यार्थ्यांवर क्रूरपणे हल्ले करण्यात आले. पोलिसांनी तातडीने हिंसाचार थांबवून शांतता कायम ठेवावी. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थीच सुरक्षित नसतील तर देशाची प्रगती कशी होईल? 
- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री दिल्ली 

काही मुखवटाधारी गुंडांनी जेएनयूतील विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ले केले यामध्ये काही जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या देशाचे नियंत्रण फॅसिस्ट शक्तींच्या हाती असल्याने ते शूर विद्यार्थ्यांच्या आवाजाला घाबरतात. आज विद्यापीठात झालेल्या हिंसाचारातून त्यांच्या भीतीचे प्रतिबिंब उमटते. 
- राहुल गांधी, नेते कॉंग्रेस 

"जेएनयू'मधील विद्यार्थी आणि शिक्षकांवर झालेल्या क्रूर हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. या नीच कृत्याचा निषेध करण्यासाठी आमच्याकडेदेखील शब्द नाहीत. लोकशाहीसाठी ही लाजिरवाणी बाब आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांप्रती सहानुभूती व्यक्त करण्यासाठी तृणमूलचे चारसदस्यीय शिष्टमंडळ लवकरच दिल्लीला रवाना होणार आहे. 
- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री पश्‍चिम बंगाल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar calls attack on JNU students undemocratic planned