
महाराष्ट्रातील प्राध्यापक डॉ. रोहन चौधरी यांना वैद्यकीय कारणास्तव रजा घेतल्यामुळे जेएनयूने सेवामुक्त केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या निर्णयावर शिक्षक संघ आणि प्राध्यापकांमध्ये तीव्र नाराजी असून, आदेश मागे घेण्याची मागणी होत आहे.
कुलगुरूंची कारवाई अन्यायकारक व हुकूमशाही असल्याचा आरोप होत असून, महाराष्ट्रातील राजकीय नेतेही चौधरींच्या पाठीशी उभे राहिले आहेत.
JNU Professor Termination: जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) महाराष्ट्रातील प्राध्यापक डॉ. रोहन चौधरी यांची सेवा समाप्त केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. वैद्यकीय कारणांमुळे घेतलेल्या रजेवरून विद्यापीठ प्रशासनाने ही कारवाई केली आहे. मात्र, विद्यापीठ प्रशासनाला कोणत्या नियमांचा भंग झाला हे सांगता येत नसल्यामुळे संपूर्ण प्रकरणावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शिक्षक संघ, विद्यार्थी आणि महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळ या निर्णयाविरोधात आक्रमक झाले आहेत.