जेएनयूमध्ये चारही जागांवर डाव्यांचा विजय; अभाविप पराभूत

वृत्तसंस्था
रविवार, 10 सप्टेंबर 2017

विद्यार्थी युनियनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डाव्या आघाडीच्या गीता कुमारीने हिने अभाविपच्या निधी त्रिपाठीचा 464 मतांनी पराभव केला. गीता कुमारीने पीटीआयशी बोलताना सांगितले, की मला विजय विद्यार्थ्यांमुळे मिळाला असून, विद्यार्थ्याचा अजून लोकशाहीवर विश्वास आहे. बेपत्ता विद्यार्थी नजीब विषयी आम्ही आवाज उठवू. तसेच जेएनयूमध्ये जागांची कपात, नवीन हॉस्टेल याविषयी बोलू. 

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी युनियनच्या निवडणुकीत डाव्या आघाडीच्या पॅनलने चारही जागांवर बाजी मारत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) पाठिंबा असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) पराभव केला.

विद्यार्थी युनियनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डाव्या आघाडीच्या गीता कुमारीने हिने अभाविपच्या निधी त्रिपाठीचा 464 मतांनी पराभव केला. गीता कुमारीने पीटीआयशी बोलताना सांगितले, की मला विजय विद्यार्थ्यांमुळे मिळाला असून, विद्यार्थ्याचा अजून लोकशाहीवर विश्वास आहे. बेपत्ता विद्यार्थी नजीब विषयी आम्ही आवाज उठवू. तसेच जेएनयूमध्ये जागांची कपात, नवीन हॉस्टेल याविषयी बोलू. 

शनिवारी रात्री उशिरा या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये युनायटेड लेफ्टने चारही जागांवर सहजपणे विजय मिळवला. गेल्यावर्षी ९ फेब्रुवारी रोजी कन्हैया कुमारच्या नेतृत्त्वाखाली ‘जेएनयू’त झालेल्या आंदोलनानंतरही एआयएसए-एसएफआय या डाव्या आघाडीने चारही जागा जिंकल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीतही त्याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळाली. एआयएसए, एसएफआय आणि डीएसएफ या तिन्ही डाव्या संघटनांनी यावर्षी एकत्र निवडणूक लढवली होती. एआयएसएच्या सिमोन झोया खान हिने उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळविला. तर, ‘एसएफआय’च्या दुग्गिराला श्रीकृष्ण हिची सचिवपदी आणि शुभांशु सिंग याची सहसचिव पदी निवड झाली.

Web Title: JNU Student Union Election: United Left defeat ABVP, win all four posts of central panel