Jodhpur Bus Accident
esakal
राजस्थानच्या जोधपूरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. भाविकांनी भरलेली बस ट्रकवर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला. यात १८ भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरु केलं आहे. ही बसमधील प्रवासी बीकानेर जिल्ह्यातील कोलायात येथून देवदर्शन करून परतत होते, अशी माहिती आता पुढे आली आहे.