'या' प्रकरणातही सलमान खानला दिलासा

वृत्तसंस्था
सोमवार, 17 जून 2019

चिंकारा काळवीट शिकार प्रकरणी दाखल केलेल्या खोट्या प्रतिज्ञापत्र प्रकरणातही जोधपूर न्यायालयाने सलमान खानला दिलासा दिला आहे.

जोधपूर : चिंकारा काळवीट शिकार प्रकरणी दाखल केलेल्या खोट्या प्रतिज्ञापत्र प्रकरणातही जोधपूर न्यायालयाने सलमान खानला दिलासा दिला आहे. 1998 साली 'हम साथ साथ है' चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी चिंकारा काळवीट शिकार प्रकरण घडले होते. त्यामुळे सलमान खान आणि त्याच्या सहकाऱ्यांना याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. 

गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीनंतर हा निर्णय राखून ठेवण्यात आला होता. खोटे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता, असे सलमानच्या वकीलांनी म्हटले आहे. 
काळवीट शिकार प्रकरणी यापूर्वी एकूण तीन खटले दाखल करण्यात आले होते.

शस्त्र बाळगण्याचा परवाना (आर्म्स अॅक्ट) खटल्यात यापूर्वीच सलमानची सुटका करण्यात आली आहे. शस्त्र बाळगण्याचा परवाना हरवल्याचे स्पष्टीकरण सलमानने त्यावेळी दिले होते. त्यामुळे सलमानने खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी 2006 साली करण्यात आली होती. मात्र, सलमानचा हा परवाना नुतनीकरणासाठी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणी सलमानला दिलासा मिळाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jodhpur Court Acquits Salman Khan In Submitting Fake Affidavit In Black Buck Poaching Case