एकत्रित निवडणुकांसाठी राष्ट्रपती मुखर्जी अनुकूल

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 जानेवारी 2017

अनेक अडचणी दूर होण्याचे मतप्रदर्शन

नवी दिल्ली: देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याच्या निर्णयाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बुधवारी पाठिंबा दर्शविला. एकत्रित निवडणुका घेण्यामुळे खर्च आणि व्यवस्थापनाशी संबंधित सर्व अडचणी दूर होतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अनेक अडचणी दूर होण्याचे मतप्रदर्शन

नवी दिल्ली: देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याच्या निर्णयाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बुधवारी पाठिंबा दर्शविला. एकत्रित निवडणुका घेण्यामुळे खर्च आणि व्यवस्थापनाशी संबंधित सर्व अडचणी दूर होतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.

राष्ट्रपतींनी एकत्रित निवडणुकांसंदर्भात निवडणूक आयोगाला पावले उचलण्याचा सल्ला दिला. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त येथे आयोजित एका कार्यक्रमात ते म्हणाले, की आयोगाने सर्व राजकीय पक्षांना एका व्यासपीठावर आणावे, जेणेकरून या मुद्यावर विचार केला जाऊ शकेल. राजकीय पक्षांनीही एकत्रितपणे यावर विचारविनिमय करावा आणि यामध्ये निवडणूक आयोगालाही सहभागी करून घेतले पाहिजे.

सर्व राजकीय पक्ष गांभीर्याने या मुद्यावर सहमत झाले, तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित होऊ शकतील, यावर मला स्वत:ला विश्‍वास वाटतो. एकत्रित निवडणुकांमुळे खर्च आणि व्यवस्थापनासंदर्भात होणाऱ्या सर्व अडचणी संपुष्टात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

निवडणूक आयोगाची स्तुती
लोकसभा निवडणुकांदरम्यान भारतीय मतदारांनी परिपक्वतेचे दर्शन घडविल्याचे सांगून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 1984 आणि 2014 मध्ये देशात बहुमताचे सरकार सत्तेवर आल्याचे निदर्शनास आणून दिले. मोठ्या संख्येने मतदान होण्यासाठी मतदारांना मदत आणि त्यांना आवश्‍यक पायाभूत सुविधा निर्माण करून देण्याच्या निवडणूक आयोगाच्या भूमिकेचीही त्यांनी स्तुती केली.
....................

Web Title: Joint election for the President friendly