जोसुआ डिसोझा यांना हवी भाजपची उमेदवारी

Josuaa DSouza wants BJPs candidature in panaji goa
Josuaa DSouza wants BJPs candidature in panaji goa

पणजी : माजी उपमुख्यमंत्री ॲड फ्रांसिस डिसोझा यांचे पूत्र जोसुआ यांनी अखेरीस आज भाजपकडून विधानसभा पोट निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. १४ फेब्रुवारीला दर्घ आजारानंतर डिसोझा यांचे निधन झाले.

जोसुआ सध्या म्हापसा पालिकेत नगरसेवक आहेत. डिसोझा हे म्हापशाचे सलग २७ वर्षे आमदार होते.पाच पैकी चार विधानसभा निवडणुका त्यांनी भाजपच्या उमेदवारीवर जिंकल्या होत्या. भाजपचा अल्पसंख्याक चेहरा म्हणून ते ओळखले जात. गोव्यातील ख्रिस्ती अल्पसंख्याक सुमदाय ज्या वेळेस भाजपपासून अंतर ठेऊन असे त्या काळात डिसोझा यांनी मनोहर पर्रीकर यांच्या आग्रहास्तव भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते भाजपशी एकनिष्ठ राहिले. पर्रीकर यांच्या २०१२ मध्ये सत्तारुढ झालेल्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते. मात्र २०१५ मध्ये पर्रीकर यांना संरक्षणमंत्रीपदी संधी देण्यात आली तेव्हा डिसोझा यांच्याऐवजी तत्कालीन आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना मुख्यमंत्रीपदाची संधी भाजपने दिली. त्यावेळी जाहीर नाराजी व्यक्त करण्यापलीकडे डिसोझा यांनी काही केले नाही.

आताच्या सरकारमध्ये सुरवातीचे वर्षभर ते नगरविकासमंत्री होते. कर्करोगावरील उपचारासाठी ते अमेरीकेत असतानाच एम्समध्ये तशाच आजारावर उपचार घेणाऱ्या मुख्यमंत्री पर्रीकर यांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले होते.त्यानंतर ते प्रकृती अस्वास्थामुळे विधानसभेत कधीच आले नाहीत. आता त्यांचे पूत्र जोसुआ यांनी भाजपच्या उमेदवारीवर विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com