पत्रकारितेची सुरवात महाभारतापासून : दिनेश शर्मा 

पीटीआय
शुक्रवार, 1 जून 2018

आधुनिक काळातील संशोधनाला आणि शोधाला प्राचीन भारताशी जोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप नेत्यांत आता उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांचाही समावेश झाला आहे. पत्रकारितेची सुरवात महाभारत काळापासून झाल्याचे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी आज एका कार्यक्रमात म्हटले आहे. 

मथुरा - आधुनिक काळातील संशोधनाला आणि शोधाला प्राचीन भारताशी जोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप नेत्यांत आता उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांचाही समावेश झाला आहे. पत्रकारितेची सुरवात महाभारत काळापासून झाल्याचे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी आज एका कार्यक्रमात म्हटले आहे. 

हिंदी पत्रकारिता दिवसनिमित्त आयोजित कार्यक्रमात शर्मा बोलत होते. पुराणातील कथांचा संदर्भ देत शर्मा म्हणाले, की संजय यांनी हस्तिनापूर येथे बसूनच धृतराष्ट्र यांना महाभारताचा "आँखो देखा हाल' सांगितला होता. हे थेट प्रक्षेपण नाही तर काय आहे? एवढेच नाही तर शर्मा यांनी नारदाची तुलना गुगलशी केली. ते म्हणाले, की गुगलची आता कोठे सुरवात झाली आहे. मात्र आपले गुगल अगोदरच प्राचीन काळापासूनच सुरू झालेले आहे. नारदमुनी हे ज्ञानाचे भांडार होते. तीनदा नारायण म्हणताच ते कोठेही पोचत असत आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश देत असत. 
 

Web Title: Journalism is started from Mahabharata says dinesh Sharma