तो एक फोन... अन्‌ १२ मंत्री बाद

मोदी मंत्रिमंडळातील फेरबदलांबाबत भाजप सूत्रांकडून ‘सकाऴ ला रोचक माहिती मिळाली.
JP Nadda
JP NaddaSakal

नवी दिल्ली - वार बुधवार...७ जुलै.. दिल्लीतील अति उष्म्याची सकाळ... विस्ताराच्या घंटा घणाणू लागलेल्या.... पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आपल्या टीममध्ये कोणते नवे मंत्री (New Minister) घेणार याची उत्सुकता...पंतप्रधानांकडे पोचलेल्या संभाव्य मंत्र्यांच्या बातमीपाठी धावणारा मीडीया (Media) आणि त्याच वेळी इकडे मोतीलाल नेहरू मार्गावरील भाजपाध्यक्ष जे. पी.नड्डा (JP Nadda) हे आपल्या बंगल्यातील एका खोलीतून एका मागोमाग एक फोन कॉल्सचा धडाका सुरू करतात... नंतरच्या एखादा दोन तासांत पानगळ व्हावी तसे हर्षवर्धन, रमेश पोखरियाल निशंक आदी १० मंत्र्यांचे एकामागोमाग एक राजीनामे देण्याचे सत्र सुरू होते....यातील अखेरची पानगळ म्हणजे शपथविधीला काही मिनिटे उरलेली असताना रविशंकर प्रसाद व प्रकाश जावडेकर या दोन हेवीवेट मंत्र्यांनीही राजीनामे दिल्याचा बॉम्बगोळा मीडियावर आदळतो... 9JP Nadda BJP Politics Minister Resign Media)

मोदी मंत्रिमंडळातील फेरबदलांबाबत भाजप सूत्रांकडून ‘सकाऴ ला रोचक माहिती मिळाली. पंतप्रधानांनी गेले दोन-तीन महिने विविध मंत्रालयांच्या कामकाजाचा स्वतः आढावा घेतल्यावर गृहमंत्री अमित शहा, नड्डा व संघटनमंत्री बी एल संतोष यांच्याशी दीर्घ विचारविनिमय केला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या गैरव्यवस्थापनावर उपाय केलाच पाहिजे, यावर चौघांचेही मतैक्य झालेले. ‘ब्रॅंड मोदी'' वाचविण्यासाठी काही मंत्र्यांना डच्चू मिळणार, हे ‘सकाऴ''चे दोन महिन्यांपूर्वीचे वृत्त तंतोतंत खरे ठरविणारा हा घटनाक्रम ! त्यानंतर ज्यांना घरी बसवायचे अशा मंत्र्यांची यादी तयार झाली. संबंधितांना, तुम्ही ७ जुलैला दिल्लीतच थांबावे असे निर्देश प्रथम दिले गेले. नंतरचा प्रश्न होता की, या मंत्र्यांना ‘तुम्ही राजीनामा राष्ट्रपती भवनाला धाडून द्यावा‘, इतक्या स्वच्छ शब्दांत निरोप सांगणार कोण,..शहांनी त्यांच्या स्टाईलमध्ये हा निरोप दिला असता तर काही मंत्र्यांना धडकी भरण्याची शक्यता होती... अखेर नड्डा यांनी स्वतःच जबाबदारी उचलली.

JP Nadda
मनाली: मास्क नसेल तर पाच हजारांचा दंड आणि 8 दिवस तुरुंगवास

अन् फोनाफोनी सुरू

त्यांनी सर्वप्रथम जलशक्ती राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांना दूरध्वनी करून एका वाक्यात निरोप दिला. त्यानंतर निशंक, हर्षवर्धन, संजय धोत्रे, सदानंद गौडा, प्रताप सारंगी आदींनाही नड्डा यांनी असेच फोन केले. प्रत्येक फोन काही मिनिटांचा...राजीनामा द्या, पण का ? माझे काय चुकले ? हे विचारण्याची तर यातील कोणाचीही प्राज्ञा नव्हती हे सध्याचे उघड सत्य. बाबूल सुप्रियो यांच्यासारख्यांनी आपले दुःख फेसबुकवरून व्यक्त केले. आपला विनाकारण राजीनामा घेतल्याचे त्यांनी निकटवर्तीयांना सांगितले. मात्र त्यातून मेसेज हा दिला गेला की सुप्रियो बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या जवळ जायची धडपड करत आहेत.

प्रसाद यांचा राजीनामा

प्रसाद यांनी राजीनामा पाठविल्यावर काही क्षणांत आपल्या ट्विटर हॅंडलवरून मंत्री वगैरे उपनामे हटवून फक्त खासदार, पाटणा एवढाच उल्लेख ठेवला. आपल्यातील ‘खासदारा़''चा पक्षही त्यांनी काढून टाकला. मंत्र्यांची खाती जाहीर झाल्यावर पीयूष गोयल यांना रेल्वे खाते काढून घेतल्याचे समजल्यावर त्यांनी काही फोन करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हे तातडीने बंद करा असे त्यांना बजावण्यात आल्याचे समजते... अशा रीतीने मोदी यांच्या ऑपरेशनची प्रत्यक्ष अंमलबजावणी सौम्य स्वभावाचे नड्डा यांनी केली.

JP Nadda
'कोव्हॅक्सिन'चा आपत्कालीन वापराच्या यादीत लवकरच समावेश

अन दानवे निर्धास्त....

ज्या मंत्र्यांना नारळ द्यायचा त्या यादीत सुरवातीला रावसाहेब दानवे पाटील यांचेही नाव होते, असे खात्रीलायकरीत्या कळते. मात्र ते यापासून सहीसलामत सुटले. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न इतका तापलेला असताना दानवे यांच्यासारख्या जनसंघापासूनच्या ज्येष्ठ मराठा पक्षनेत्यावर भाजपने हा अन्याय केला, असा मेसेज यातून जाईल तेव्हा तुम्हीच बघा बुवा, असा संदेश त्यांच्या वतीने महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाकडे पोहोचविला गेल्याचे समजते. तिकडून दिल्लीला फोनाफोनी झाली आणि... दुपार उलटता उलटता दानवे निर्धास्त झाल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com