JP Nadda Statement
esakal
JP Nadda on Lathicharge: आंदोलन करायचं असेल तर तुरुंगात जायची आणि त्याचे परिणाम भोगायची तयारी ठेवा, असे वक्तव्य भाजपचे नेते जे. पी. नड्डा यांनी राज्यसभेत केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला. विरोधकांनी या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेत ते मागे घेण्याची मागणी केली. यावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.