JSSC JE Paper Leak : झारखंडमधील पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; परीक्षा घेणाऱ्या एजन्सीच्या संचालकाला मुंबईतून अटक

SIT Probe : पाटण्यात उमेदवारांना प्रश्न आणि उत्तरे पाठ करून घेण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचेही तपासात समोर आले आहे. या प्रकरणात पाच आरोपी तुरुंगात असून, JPSC चे माजी अध्यक्ष एल. खियांगते यांनाही अटक करण्यात आली आहे; फरार आरोपींचा SIT शोध घेत आहे.
JSSC JE Paper Leak Case

JSSC JE Paper Leak Case: SIT Arrests Arun Kumar in Mumbai

esakal

Updated on

JSSC JE Paper Leak Case: SIT Arrests Arun Kumar in Mumbai : झारखंडमध्ये विद्यार्थ्यांची आंदोलने सुरू असतानाच, JSSC JE (कनिष्ठ अभियंता) परीक्षा पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. विशेष तपास पथकाने (SIT) परीक्षा घेणाऱ्या एजन्सीचे संचालक अरुण कुमार यांना मुंबईतून अटक केली आहे. अरुण कुमार हे 'बायन्सिस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड' या एजन्सीचे संचालक आहेत; हीच एजन्सी २०२२ ची JSSC कनिष्ठ अभियंता परीक्षा आयोजित करण्यासाठी जबाबदार होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com