Abhijit Gangopadhyay : न्यायाधीशपद सोडून राजकारणात येणार, न्या. गंगोपाध्याय आज देणार राजीनामा; व्यापक जनसेवेची इच्छा

कलकत्ता उच्च न्यायालयातील न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय हे उद्या (ता. ५) आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत.
Abhijit Gangopadhyay
Abhijit GangopadhyaySakal

कोलकता : कलकत्ता उच्च न्यायालयातील न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय हे उद्या (ता. ५) आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांनीच याबाबत घोषणा केली. राजीनाम्यानंतर ते सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. एवढेच नाही तर, भाजपच्या तिकिटावर ते निवडणूकही लढविणार असल्याचीही चर्चा आहे.

न्या. गंगोपाध्याय यांनी शिक्षण क्षेत्राबाबत दिलेल्या काही निर्णयांमुळे पश्‍चिम बंगालमध्ये राजकीय वाद निर्माण झाला होता. न्या. गंगोपाध्याय हे याच वर्षी निवृत्त होणार होते. त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा देऊन राजकारणात जाण्याचे सूतोवाच केले आहेत.

दुर्बल घटकांना मदत करण्याची ज्यांची इच्छा आहे, त्यांच्यासाठी राजकारण हेच क्षेत्र योग्य आहे, असे विधान त्यांनी केले आहे. मात्र, इतर बाबी राजीनामा दिल्यानंतरच जाहीर करू, असे त्यांनी सांगितले आहे.

मागील दोन वर्षांत आपण भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे हाताळली असल्याचेही त्यांनी सांगितले. विशेषत: राज्यातील शिक्षण क्षेत्रात प्रचंड भ्रष्टाचार असून तो बाहेर येणे आवश्‍यक असल्याचे ते म्हणाले. तसेच, उद्योगपतींकडून कामगारांना लुबाडले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

पश्‍चिम बंगाल सरकारमधील भ्रष्टाचाराबाबतच्या अनेक प्रकरणांची सुनावणी न्या. गंगोपाध्याय यांच्यासमोर झालेली आहे. त्यांनी एका बंगाली वाहिनीला मुलाखत दिल्यावरून वाद झाला होता. यावरून सरन्यायाधीशांनीही नाराजी व्यक्त करताना, मुलाखत देणे न्यायाधीशांचे काम नाही,’ असे फटकारले होते.

सरन्यायाधीशांच्या सूचनेवरून पश्‍चिम बंगालच्या मुख्य न्यायाधीशांनी न्या. गंगोपाध्याय यांच्याकडील काही प्रकरणे काढून घेत इतर न्यायाधीशांकडे सोपविली होती. काही प्रकरणांमध्ये त्यांनी झटपट निर्णय देत याचिकाकर्त्यांना दिलासा दिल्याने त्यांचे कौतुकही झाले होते. शिक्षक भरती प्रकरणी चौकशी करण्याच्या त्यांनी ‘सीबीआय’ आणि ‘ईडी’लाही दिल्या होत्या.

डायमंड हार्बरमधून निवडणूक रिंगणात

राजीनामा दिल्यानंतर न्या. गंगोपाध्याय हे दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील डायमंड हार्बर या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांचा हा मतदारसंघ आहे. ते खरेच येथून लढणार का आणि कोणत्या पक्षामार्फत लढणार किंवा अपक्ष म्हणून लढणार, हे ते राजीनामा दिल्यानंतर जाहीर करणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com