Arvind Kejriwal : केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडी

दिल्ली सरकारच्या मद्य धोरण गैरव्यवहारात ‘ईडी’च्या कोठडीत असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आज १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
Arvind Kejriwal
Arvind Kejriwalsakal

नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या मद्य धोरण गैरव्यवहारात ‘ईडी’च्या कोठडीत असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आज १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

मुख्यमंत्री केजरीवाल यांची ‘ईडी’ कोठडी आज संपली. सीबीआयच्या विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्या न्यायालयासमोर आज ‘ईडी’ने मुख्यमंत्री केजरीवाल यांची कोठडी मागितली नाही. आज आम्ही मुख्यमंत्री केजरीवाल यांची ‘ईडी’ कोठडी मागत नाही परंतु गरज पडल्यास पुन्हा कोठडी मागू, असे ‘ईडी’च्या वकिलांनी आज न्यायालयात सांगितले.

या प्रकरणात आता आपच्या तिसऱ्या नेत्याची तिहार तुरुंगात रवानगी झाली आहे. यापूर्वीच माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया व खासदार संजय सिंह तिहार तुरुंगात आहेत.

Arvind Kejriwal
Loksabha Election 2024 : लक्षवेधी लढत : भाजपच्या वर्चस्वाला काँग्रेस यंदा तरी आव्हान देणार?

दरम्यान, केजरीवाल यांनी आज गीता, रामायण आणि ‘हाऊ प्राईममिनिस्टर डिसाईड’ या पुस्तकांची मागणी केली. न्यायालयीन कोठडीत ते कोणत्याही फाइल तुरुंगात मागवू शकणार नाही किंवा अधिकारी त्यांना भेटू शकणार नाही.

आजच्या सुनावणीच्यावेळी ईडीने दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी मार्लेना व सौरभ भारद्वाज यांच्याही भोवती चौकशीचा फास आवळणार असल्याचे सूतोवाच केले. या नेत्यांचे नाव पहिल्यांदाच घेण्यात आली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com