Mukhtar Ansari : अन्सारीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी

कलम १४४ लागू, वाराणसी, बांदात ‘सीआरपीएफ’च्या तुकड्या तैनात
Mukhtar Ansari
Mukhtar Ansariesakal

लखनौ : कुख्यात गुंड-राजकारणी मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांत सुरक्षा सुव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारीही सुरक्षा दलांना दक्ष राहण्याच्या सूचना होत्या. संपूर्ण राज्यात प्रतिबंधात्मक कलम १४४ लागू करण्यात आले आहे. बांदा, माऊ, गाझीपूर आणि वाराणसीत केंद्रीय राखीव पोलिस दला (सीआरपीएफ)सह पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, अन्सारीच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.

Mukhtar Ansari
Yoga For Liver Health : यकृत निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत 'ही' योगासने, जाणून घ्या करण्याची योग्य पद्धत

अन्सारीच्या गाझिपूरमधील घराभोवती लोक गोळा होऊ लागल्याने सुरक्षा दलांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बांदा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने हे शवविच्छेदन केले असून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला. शवविच्छेदनानंतर अन्सारीचा मृतदेह त्याचा मुलगा उमर अन्सारी व वकील नसीम हैदर यांच्याकडे अंत्यसंस्कारासाठी सुपूर्द केला जाईल. तो फतेहपूर, कौशंबी, प्रयागराज आणि वाराणसीमार्गे गाझिपूरला नेला जाईल. तेथील कालीबागमध्ये उद्या (ता.३०) त्याच्यावर अंत्यसंस्कार होतील. रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, जिल्हा दंडाधिकारी तसेच पोलिस अधीक्षकही उपस्थित आहेत. रुग्णालयाभोवती मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहेत. कोणत्याही परिस्थितीत जीविताचे रक्षण करणे, हे सरकारचे कर्तव्य आहे, असे नमूद करत मुख्तार अन्सारीच्या मृत्यूची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली.

Mukhtar Ansari
Summer Health Care : उन्हाळ्यात त्वचा, डोळ्यांची घ्या काळजी; नेत्रतज्ज्ञांचा सल्ला

महिन्याभरात चौकशी अहवाल

उत्तर प्रदेशातील बांदामधील मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयाने शुक्रवारी मुख्तार अन्सारीच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश दिले. बांदाचे मुख्य न्याय दंडाधिकारी भगवानदास गुप्ता यांनी अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी गरिमा सिंह यांची या प्रकरणी तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केली. ते एक महिन्यात चौकशीचा अहवाल न्यायालयाला सोपवतील.

Mukhtar Ansari
Mental Health: मेंटली चेकआउट म्हणजे काय? जाणून घ्या लक्षण अन् उपाय

कोठडीतील सर्व मृत्यूंची चौकशी करा

पोलिस कोठडीत मृत्यू होण्यामध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर असून कोठडीतील प्रत्येक मृत्यूची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे उत्तर प्रदेशातील नेते पंखुरी पाठक यांनी केली. याबाबत राज्य सरकार व पोलिसांनी एवढे अनियंत्रित होणे अतिशय चिंताजनक व धोकादायक आहे. कोठडीत मृत्यू होणाऱ्यांत दलित, मुस्लिम, ब्राह्मण, मागसवर्गीयांसह सर्वजातातील आरोपींचा समावेश आहे.

विषप्रयोग केल्याचा मुलाचा आरोप

आपल्या वडिलांवर तुरुंगात विषप्रयोग (स्लो पॉयझनिंग) केल्याचा आरोप मुख्तार अन्सारीचा मुलगा उमर अन्सारी याने केला. मात्र, अधिकाऱ्यांनी तो फेटाळला. उमर अन्सारी म्हणाला, की वडिलांच्या मृत्यूचे वृत्त प्रसारमाध्यमांतून समजले. त्यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करू आणि न्यायालयामार्फत जे करायचे ते करू. आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. न्यायालयात न्याय मिळेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. गाझीपूरचे खासदार व मुख्तार अन्सारीचे भाऊ अफजल अन्सारी यांनीही मंगळवारी (ता. २६) मुख्तार अन्सारी यांना तुरुंगात विष देत असल्याचा आरोप केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com