न्यायसंस्था पुरोगामी आणि सक्रिय - रामनाथ कोविंद

ramnath-kovind
ramnath-kovind

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने कायमच सक्रिय आणि पुरोगामी भूमिका निभावली आहे, असे कौतुकोद्गार काढत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज लिंग समानता आणण्यासाठी न्यायव्यवस्था करत असलेल्या प्रयत्नांचे स्वागत केले. आंतरराष्ट्रीय न्यायिक परिषदेचा आज राष्ट्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला. 

राष्ट्रपती कोविंद म्हणाले,‘‘देशात होणाऱ्या पुरोगामी सामाजिक बदलाचे सर्वोच्च न्यायालयाने नेतृत्व केले आहे. कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी दोन दशकांपूर्वी घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांपासून ते दोन दिवसांपूर्वी लष्करात महिलांना समान दर्जा देण्याबाबत दिलेला निर्णयापर्यंत न्यायालयाने कायमच लिंग समानतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. न्याय सामान्य नागरिकांच्या आवाक्यात आणण्यासाठी अनेक मूलभूत सुधारणा केल्याबद्दल हे न्यायालय कौतुकास पात्र आहे.’’

न्याय देण्याची कटिबद्धता हा सर्व न्यायाधीशांना कर्तव्याशी जोडून ठेवणारा समान धागा आहे. सत्तेत असणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच दुर्लक्षित घटकांना सामर्थ्यवान बनविणे, हेदेखील न्यायसंस्थेचे काम आहे. 
- सरन्यायाधीश शरद बोबडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com