सरन्यायाधीश रंजन गोगोईंनी फेटाळला विनयभंगाचा आरोप

वृत्तसंस्था
शनिवार, 20 एप्रिल 2019

या प्रकरणी रंजन गोगोई यांनी म्हटले आहे, की माझ्यावर झालेल्या आरोपांबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी मला पातळी सोडण्याची गरज नाही. न्यायव्यवस्था धोक्यात असून, मी तिला बळीचा बकरा बनू देणार नाही.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर विनयभंगाचा आरोप करण्यात आल्यानंतर त्यांनी आरोप फेटाळून लावत न्यायाव्यवस्था धोक्यात असल्याचे म्हटले आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर न्यायालयात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने आरोप केला आहे. या महिलेने याबाबतचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल केले असून, यावर लवकरच सुनावणी होणार आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या प्रकरणी विशेष खंडपीठाची स्थापना केली आहे. यामध्ये न्यायाधीश अरुण मिश्रा आणि संजीव खन्ना यांचा समावेश आहे.

या प्रकरणी रंजन गोगोई यांनी म्हटले आहे, की माझ्यावर झालेल्या आरोपांबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी मला पातळी सोडण्याची गरज नाही. न्यायव्यवस्था धोक्यात असून, मी तिला बळीचा बकरा बनू देणार नाही.

Web Title: Judiciary Under Threat Chief Justice Ranjan Gogoi Denies Sex Harassment Allegation