मुलांचे व्हिडिओ पॉर्न साईट्सना विकणाऱ्या ज्यूनियर इंजिनिअरला अटक; सीबीआयची कारवाई

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 17 November 2020

उत्तर प्रदेशातील सिंचाई विभागात कार्यरत एका ज्यूनियर इंजिनिअरला (Junior Engineer Latest News) सीबीआयने अटक केली आहे.

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशातील सिंचाई विभागात कार्यरत एका ज्यूनियर इंजिनिअरला (Junior Engineer Latest News) सीबीआयने अटक केली आहे. यांसंबंधी सीबीआय अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, हा व्यक्ती गेल्या 10 वर्षांपासून लहान मुलांचा लैंगिक छळ करत आला आहे. आरोपी याचे व्हिडिओ बनवायचा. त्यानंतर याचे फोटो आणि व्हिडिओ जगभरातील पॉर्न साईट्सना विकायचा.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यूनियर इंजिनिअरने आतापर्यंत जवळपास 50 लहान मुलांना आपला शिकार बनवलं आहे. यात 5 ते 16 वर्षांच्या मुलांचा समावेश आहे. पीडित मुले बांदा, चित्रकूट आणि हमीरपूरचे राहणारे आहेत. आरोपीला बांदामधून अटक करण्यात आली असून त्याला लवकरच कोर्टासमोर हजर केले जाणार आहे. 

तपासणीमध्ये काय मिळालं

सीबीआईला तपासादरम्यान 8 मोबाईल फोन, आठ लाख रुपये रोख, सेक्स टॉयज, लॅपटॉपसोबत अन्य डिजिटल पुरावे ( मोठ्या प्रमाणात लहान मुलांचा लैंगिक छळ करतानाचे व्हिडिओ) मिळाले आहेत. 

अंबाजोगाईत बनावट नोटा प्रकरणी तरूणास अटक, तीन दिवसांची पोलिस कोठडी

आरोपीने सांगितले

सीबीआय अधिकाऱ्यांनी आरोपी ज्यूनियर इंजिनिअरच्या वतीने सांगितले की, तो 10 वर्षांपासून हे काळे साम्राज्य चालवत होता. तो मुख्यत्वे लहान मुलांसंबंधी लैंगिक छळासंबंधी सामग्री जगभरातील पॉर्न साईट्सना उपलब्ध करुन द्यायचा. चौकशीमध्ये आरोपीने असंही सांगितलं आहे की, आपले काळे कृत्य लपवण्यासाठी तो पीडित मुलांना पैसे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे यासह अनेक वस्तू द्यायचा.

दरम्यान, आरोपी ज्यूनियर इंजिनिअर गेल्या 10 वर्षांपासून काळे काम करत होता. याकाळात तो कसा काय पोलिस यंत्रणेच्या हाती लागला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Junior Engineer arrested by cbi in uttar pradesh