esakal | अंबाजोगाईत बनावट नोटा प्रकरणी तरूणास अटक, तीन दिवसांची पोलिस कोठडी
sakal

बोलून बातमी शोधा

नोटा बनावट.jpg

कार मधून पाच हजार दोनशे पन्नास रुपयांच्या बनावट नोटा,  दोन मोबाईल सिफ्ट कार असा एकूण दोन लाख पंधरा हजार दोनशे पन्नास रुपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. दोनशे रुपयाच्या २३ नोटा व पन्नास रुपयाचा १३ नोटा ह्या नाशिक येथील नोटा छापणाऱ्या कारखान्यात या नोटांची तपासणी करण्यात येणार आहे.

अंबाजोगाईत बनावट नोटा प्रकरणी तरूणास अटक, तीन दिवसांची पोलिस कोठडी

sakal_logo
By
राहुल किर्दंत

अंबाजोगाई (बीड) : शहरातील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय परिसरात दोन तरुण बनावट नोटाचा आर्थिक व्यवहार करत असल्याची माहिती अंबाजोगाई शहर पोलिसांना मिळाली.  सोमवारी (ता.१६) रात्री दहाच्या सुमारास दोन तरुण कारमध्ये बसून बनावट नोटाचा आर्थिक व्यवहार करत असताना पोलिसांनी छापा टाकला. यात एकास अटक करण्यात आली. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
पोलीस अधीक्षक आर. राजा अप्पर अधीक्षक स्वाती भोर उपअधीक्षक सुनील जायभाये यांच्या आदेशाने अंबाजोगाई शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे, पोलीस निरीक्षक गोपाळ सुर्यवंशी, सहाय्यक उपनिरीक्षक श्री. घोडके, पोलीस कर्मचारी श्री कुंडीगीर, श्री घोळवे, पठाण यांनी स्वामी रामानंद तीर्थ परिसरात (एम. एच.४४ जी १९९३) स्विफ्ट कार मध्ये बसून दोन तरुण दोनशे व पन्नास रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्यासाठी आर्थिक व्यवहार करत असताना पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात संजय सखाराम चौधरी (वय २९) यास अटक केली . 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कार मधून पाच हजार दोनशे पन्नास रुपयांच्या बनावट नोटा,  दोन मोबाईल सिफ्ट कार असा एकूण दोन लाख पंधरा हजार दोनशे पन्नास रुपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. दोनशे रुपयाच्या २३ नोटा व पन्नास रुपयाचा १३ नोटा ह्या नाशिक येथील नोटा छापणाऱ्या कारखान्यात या नोटांची तपासणी करण्यात येणार आहे. संजय चौधरी यांना मंगळवारी (ता.१७)  दुपारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात संजय बाळासाहेब पांचाळ हा  पळून गेला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत. पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक गोपाळ सूर्यवंशी करत आहेत.

(संपादन-प्रताप अवचार)