नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे ५२ वे सरन्यायाधीश (Chief Justice of the Supreme Court) म्हणून न्या. भूषण गवई (Bhushan Gavai) हे आज (ता. १४) कार्यभार स्वीकारणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. महाराष्ट्रीय असलेले गवई हे अनुसूचित जातींचे (Scheduled Caste) प्रतिनिधित्व करणारे दुसरे सरन्यायाधीश ठरणार आहेत. या वर्गाचे प्रतिनिधित्व करण्याचा पहिला बहुमान आधी सरन्यायाधीश न्या. के. जी. बालकृष्णन यांना मिळाला होता. २००७ ते २०१० याकालावधीत त्यांनी काम पाहिले होते.