

Supreme Court: देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सोमवारी शपथ घेतली. न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे ५३वे सरन्यायाधीश असतील. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. या कार्यक्रमास निवृत्त सरन्याायधीश भूषण गवई यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांच्या कृतीने अनेकांच्या भूवया उंचावल्या.