Justice Bhushan Gavai : न्या. भूषण गवई यांचा आज शपथविधी, सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारणार

Supreme Court India : न्या. भूषण गवई हे भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून उद्या शपथ घेणार असून, अनुसूचित जातीचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिनिधित्व करणारे दुसरे सरन्यायाधीश ठरणार आहेत.
Justice Bhushan Gavai
Justice Bhushan GavaiSakal
Updated on

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून न्या. भूषण गवई हे उद्या (ता. १४) कार्यभार स्वीकारणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. महाराष्ट्रीय असलेले गवई हे अनुसूचित जातींचे प्रतिनिधित्व करणारे दुसरे सरन्यायाधीश ठरणार आहेत.या वर्गाचे प्रतिनिधीत्व करण्याचा पहिला बहुमान आधी सरन्यायाधीश न्या. के. जी. बालकृष्णन यांना मिळाला होता. २००७ ते २०१० याकालावधीत त्यांनी काम पाहिले होते. न्या. गवई यांना सहा महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये ते सेवानिवृत्त होतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com