Ayodhya Land Dispute : अयोध्याप्रकरणातील कोण आहेत हे मध्यस्थ?

Justice Kalifulla Sri Sri Ravi Shankar and Senior advocate Sriram Panchu are the three mediators in ayodhya case appointed by supreme court 
Justice Kalifulla Sri Sri Ravi Shankar and Senior advocate Sriram Panchu are the three mediators in ayodhya case appointed by supreme court 

नवी दिल्ली : अयोध्याप्रकरणी मध्यस्थीसाठी सर्वोच्च न्यायालयाने त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीत माजी न्यायमूर्ती खलीफुल्ला, अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर, श्रीराम पंचू यांचा समावेश आहे. या मध्यस्थांनी केलेली सर्व कारवाई कॅमेराच्या निगराणी खाली राहील.

या समितीला एकूण आठ आठवड्यांची मुदत दिली आहे. आता अयोध्या प्रकरणाचा निकाल लोकसभा निवडणुकांनंतर येईल हे स्पष्ट झाले आहे. पण हे तीन सदस्य आहेत कोण ? चला तर त्यांच्याबद्दल जाणून घेऊया...

माजी न्यायमूर्ती एफ. एम. खलीफुल्ला  - 
अयोध्याप्रकरणी मध्यस्थीसाठी सर्वोच्च न्यायालयाने जी त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे ती समिती न्या. खलीफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली गेली आहे. ते मुळ तामिळनाडू येथील रहिवासी आहेत. त्यांचे पुर्ण नाव फाकिर मुहम्मद इब्राहिम खलीफुल्ला असे आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या न्यायव्यवस्थेच्या क्षेत्रात त्यांनी वकील ते उच्च न्यायालयाचे न्यायाधिश, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश असा प्रवास केला आहे. 20 ऑगस्ट 1975 ला त्यांनी त्यांच्या करियर ची सुरवात केली होती. 2000 ला ते मद्रास उच्च न्यायालयात त्यांची स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. फेब्रुवारी 2011 ला ते जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे न्यायाधिश बनले. त्यानंतर दोन आठवड्यातच त्यांची नियुक्ती हंगामी न्यायाधिश म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. सप्टेंबर 2012 ला ते जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश बनले. त्यानंतर 2 एप्रिल 2012 ला ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश बनले आणि 22 जुलै 2016 ला ते निवृत्त झालेत.

श्री श्री रविशंकर -
मध्यस्थी समितीत आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचे नाव सामिल आहे. आर्ट ऑफ लिविंग चे ते संस्थापक आहेत. यापुर्वीही वैयक्तिक स्तरावर त्यांनी अयोध्या प्रकरणाचा वाद सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र त्यात त्यांना यश मिळाले नाही. काश्मीर येथील शांततेसाठी देखील वैयक्तिक स्तरावर त्यांचे प्रयत्न राहीले आहेत. श्री श्री रविशंकर यांचे देश-विदेशात करोडो अनुयायी आहेत. 1981 मध्ये आर्ट ऑफ लिविंग ची स्थापना त्यांनी केली होती. ते सामाजिक आणि सांप्रदायिक गोष्टींच्या एकत्रीकरणासाठी होणाऱ्या कार्यक्रमांसाठी ओळखले जातात.

श्रीराम पांचू - 
मध्यस्थी समितीत आणखी एक नाव म्हणजे श्रीराम पांचू. 40 वर्षापासून ते वकिली करत आहेत. पांचू गेल्या 20 वर्षापासून अयोध्या प्रकरणात सक्रिय मध्यस्थाच्या भूमिकेत आहेत. ते मिडीएशन चेंबर चे संस्थापक आहेत. त्यांनी देशातील विविध भागात व्यावसायिक, कॉरपोरेट आणि इतर क्षेत्रांशी जोडलेले काही मोठे आणि गुंतागुंतीच्या वादांमध्ये मध्यस्थी करुन सोडवले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com