

New CJI Appointment
Sakal
सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश बी. आर. गवई येत्या २३ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्यानंतर नवे सरन्यायाधीश कोण होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. नव्या सरन्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी सरकारी पातळीवर प्रयत्नदेखील सुरू झाले आहेत. अशातच आता नव्या सरन्यायाधीशांचे नाव समोर आले आहे. सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी स्वतः नव्या सरन्यायाधीशांच्या नावाची घोषणा केली आहे.