
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राबद्दल दररोज नवीन खुलासे होत आहेत. रविवारी हरियाणातील हिसारचे पोलिस अधीक्षक शशांक कुमार सावन यांनी सांगितले की, पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा ज्योती पाकिस्तान उच्चायुक्तालयातील दानिशच्या संपर्कात होती.