Video : ...आणि भरसभेत ज्योतिरादित्यांनी काँग्रेसला मतदान करण्याचे केले आवाहन

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 November 2020

ज्योतिरादित्या शिंदे हे आधी काँग्रेसमधील तरुण फळीतील एक महत्वाचे नेते मानले जायचे.

ग्वाल्हेर :  प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील डबरा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. यासाठी सध्या काँग्रेस, भाजपा आणि इतर अनेक पक्ष आपापल्या उमेदरवारासाठी प्रचार करत आहेत. या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी नुकतेच काँग्रेसमधून भाजपात गेलेले आणि राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे हेदेखील या निवडणुकीत प्रचार करत आहेत. मात्र, एका सबेत बोलताना त्यांच्याकडून भलताच घोळ झाला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात तूफान व्हायरल होत आहे. 

हेही वाचा - शनिवारी 46,964 नवे रुग्ण; तर 470 कोरोना रुग्णांचा मृत्यू

ज्योतिरादीत्य शिंदे हे भाजपा उमेदवार इमरती देवी यांच्यासाठी प्रचार करत होते. या प्रचारावेळी सभेत बोलताना शेवटी मतदारांना आवाहन करताना त्यांनी हाताच्या पंजाला मत द्या, असं म्हटलं आणि सभेत उपस्थित लोकांकडून एकच हशा पिकला. 

शिंदे यांनी आपल्या भाषणात म्हटलं की डबराची शानदार जनता दोन्ही हाताची मुठ वळून विश्वास देईल की तीन तारखेला ही जनता हाताच्या पंजाचे बटन दाबेल...

या प्रकारामुळे काँग्रेसला एक आयती संधीच चालून आली. यावर काँग्रेसने म्हटलं की, हृदयातील गोष्ट जीभेवर येतेच येते. त्यांनाही माहितीयकी कमल नाथ आणि हाताचा पंजा पुन्हा एकदा निवडून येणार आहे. मात्र, नंतर शिंदे यांना कळलं की आपण गडबडीत चुकीचं  बोलून गेलोय. मग त्यांनी आपलं बोलणं सांभाळत नंतर म्हटलं की कमळाच्या फुलाचे बटन दाबा आणि हाताच्या पंजाच्या बटनाला सोडून द्या...

हेही वाचा - गॅस सिलिंडर, बँकिंग सेवेत आजपासून मोठे बदल; ग्राहकांच्या खिशाला कात्री

ज्योतिरादित्या शिंदे हे आधी काँग्रेसमधील तरुण फळीतील एक महत्वाचे नेते मानले जायचे. मात्र, त्यांनी अलीकडेच काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jyotiraditya scindia slippery tongue appealed for voting congress