
मात्र, भारतात देखील लवकरत दुसरी लाट येईल असा अंदाज तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
नवी दिल्ली : गेल्या आठ महिन्यांपासून कोरोना विषाणूने देशातच नव्हे तर संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. युरोपातील काही देशांत आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट आधीपेक्षाही गंभीर मानली जात आहे. त्यामुळे त्या देशांत पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू केला आहे. भारतात देखील आता पहिली लाट येऊन गेली असून कोरोनाची आकडेवारी घसरती आहे. मात्र, भारतात देखील लवकरत दुसरी लाट येईल असा अंदाज तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा - गॅस सिलिंडर, बँकिंग सेवेत आजपासून मोठे बदल; ग्राहकांच्या खिशाला कात्री
भारतात दररोज कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच आहे. अलीकडे कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरीही देशाची परिस्थिती गंभीरच आहे. सध्या देशातील कोरोना संक्रमितांची संख्या जवळपास 82 लाखापर्यंत पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाद्वारे रविवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात कोरोना संक्रमितांची संख्या आता 81,84,082 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या चोविस तासांत कोरोनाचे 45 हजारहुन अधिक रुग्ण सापडले आहेत. ही आकडेवारी शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून ते रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंतची आहे. यादरम्यानच्या चोविस तासांत 46,964 नवे रुग्ण भारतात सापडले आहेत.
With 46,964 new #COVID19 infections, India's total cases surge to 81,84,083. With 470 new deaths, toll mounts to 1,22,111
Total active and cured cases are 5,70,458 and 74,91,513 respectively: Union Health Ministry pic.twitter.com/yClVACehX1— ANI (@ANI) November 1, 2020
गेल्या चोविस तासांत 58,684 रुग्ण बरे झाले आहेत. तर गेल्या चोविस तासांत 470 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूची ही आकडेवारी 7 जुलैनंतरची सर्वांत कमी आकडेवारी आहे. आतापर्यंत भारतात एकूण 74,91,513 रुग्ण या आजारातून सहिसलामत बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 1,22,111 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या कोरोना संक्रमित रुग्णांची देशातील संख्या ही 6 लाखाच्या खाली आहे. 2 ऑगस्टनंतर पहिल्यांदाच ही संख्या एवढ्या खाली आली आहे.
हेही वाचा - ...नाहीतर तुमचे राम नाम सत्य नक्की, 'लव्ह जिहाद'वरुन योगींनी दिला इशारा
सध्या देशांत 5,70,458 ऍक्टीव्ह केसेस आहेत. रिकव्हरी रेटमध्येही थोडीशी सुधारणा झाली आहे. आता रिकव्हरी रेट 91.53 वर पोहोचला आहे. पॉझीटीव्हीटी रेट 4.3 टक्के आहे. तर डेथ रेट 1.49 टक्के आहे. काल एका दिवसांत 10,91,239 कोरोनाच्या टेस्ट केल्या गेल्या आहेत. आतापर्यंत भारतात 10,98,87,303 इतक्या टेस्ट केल्या गेल्या आहेत.