Viral Video Shows Kabali Elephant Blocking Kerala Road for 18 Hours Massive Traffic Jam Reported
Esakal
देश
कबाली हत्तीनं अडवला रस्ता, १८ तास वाहतूक ठप्प; वाहनांच्या रांगा, VIDEO VIRAL
Kabali Elephant on Road : केरळमध्ये जंगलातून जाणारा रस्ता हत्तीनं अडवल्यानं राज्य महामार्गावर वाहतूक तब्बल १८ तास ठप्प झाली होती. यामुळे रस्त्यावर अनेक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
जंगली हत्तीमुळे केरळमध्ये राज्य महामार्गावर तब्बल १८ तास वाहतूक ठप्प झाली होती. केरळच्या पलक्कड जिल्ह्यात ही घटना घडली. केरळमध्ये प्रसिद्ध असलेल्या कबाली हत्तीने रस्त्यावर येत एक झाड पाडलं. हत्ती दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास महामार्गावर आला होता. त्यानंतर त्यानं ताडाचं झाड पाडलं आणि वाहतूक ठप्प झाली. यामुळे अनेक किलोमीटरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.

