भाजप आमदाराने अधिकाऱ्याला मारले बॅटने (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
बुधवार, 26 जून 2019

- भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या यांच्या मुलाकडून सरकारी अधिकाऱ्याला बॅटने मारहाण
- पहिल्यांदाच आमदार झालेला मुलगा आकाश विजयवर्गीय यांनी आज(ता.26) बुधवारी अधिकारी आपले काम करत असताना केली मारहाण
- घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

इंदूर: भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या मुलाने सरकारी अधिकारी असलेल्या व्यक्तीला बॅटने मारहाण केली. विजयवर्गीय यांचा पहिल्यांदाच आमदार झालेला मुलगा आकाश विजयवर्गीय यांनी आज(ता.26) बुधवारी इंदूर महापालिका अधिकारी आपले काम करत असताना मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महापालिका अधिकारी अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई करत असताना संतापलेल्या आमदार आकाश विजयवर्गीय यांनी अधिकाऱ्याला थेट बॅटनेच मारायला सुरवात केली. या घटनेनंतर आकाश विजयवर्गीय आणि संबधित अधिकारी पोलिस स्थानकात पोहोचले. दोन्ही पक्षांकडून पोलिसांत याबाबत तक्रार दिली आहे. अधिकारी असेच वागत राहिल्यास अधिकाऱ्यांबाबत असेच होत राहील असा इशाराही विजयवर्गीय यांनी दिला असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

दरम्यान, उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी विजयवर्गीय यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, विजयवर्गीय यांनी न थांबता त्या महापालिका अधिकाऱ्याला मारहाण केली. यानंतर मध्यप्रदेश काँग्रेसने या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर टाकत निषेध व्यक्त केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kailash Vijayvargiya Son Akash Vijayvargiya Beats Indore Municipal Employee