सोनिया गांधींची कमल हसन यांनी घेतली भेट

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 जून 2018

अभिनेते कमल हसन यांनी त्यांच्या दिल्ली दौऱ्यात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांची भेट घेतली.

नवी दिल्ली - अभिनेते कमल हसन यांनी त्यांच्या दिल्ली दौऱ्यात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांची भेट घेतली. आपल्या नवनिर्वाचित पक्षाच्या काही नोंदणी संदर्भातील औपचारिकता पूर्ण करण्यासाठी दिल्लीला गेलेल्या कमल हसन यांनी आज (गुरुवार) सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा केली. 

दरम्यान, ते अन्य कुठल्याही राजकीय नेत्याची दिल्लीत भेट घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या भेटीदरम्यान दक्षिणेतील विकासकामांवर त्यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. आपण काल (बुधवार) राहूल गांधी यांची तर, आज (गुरुवार) सकाळी सोनिया गांधी यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर, आपल्या नवीन पक्षाच्या आणि काँग्रेसच्या आघाडीबाबत कुठलीही चर्चा केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या भेटीत केवळ तामिळनाडूतील राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत कमल हसन यांची ही झालेली पहिलीच भेट होती.

Web Title: Kamal Haasan Meets Sonia Gandhi