कमलनाथांचा यु-टर्न; आता वाजत-गाजत वंदे मातरम्

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 जानेवारी 2019

मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर महिन्याच्या पहिल्या तारखेला होणारे 'वंदे मातरम्' न झाल्याने मोठा वाद झाला होता. 'वंदे मातरम्'च्या मुद्द्यावर विरोधकांसह सोशल मीडियावरही काँग्रेसबरोबरच मध्यप्रदेश सरकारचे आणि कमलनाथ यांचे वाभाडे निघाले होते. त्यामुळे जाग आलेल्या कमलनाथ सरकारने यावर यू-टर्न घेत वाजत-गाजत 'वंदे मातरम्'चे गायन होईल असे जाहीर केले आहे.

भोपाळ- मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर महिन्याच्या पहिल्या तारखेला होणारे 'वंदे मातरम्' न झाल्याने मोठा वाद झाला होता. 'वंदे मातरम्'च्या मुद्द्यावर विरोधकांसह सोशल मीडियावरही काँग्रेसबरोबरच मध्यप्रदेश सरकारचे आणि कमलनाथ यांचे वाभाडे निघाले होते. त्यामुळे जाग आलेल्या कमलनाथ सरकारने यावर यू-टर्न घेत वाजत-गाजत 'वंदे मातरम्'चे गायन होईल असे जाहीर केले आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशातील कर्मचाऱ्यांच्या वंदे मातरम् गायनावर बंधन घालण्याचे आदेश मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिले होते. राज्य सचिवालयाच्या बाहेर प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला वंदे मातरम् या भारतीय राष्ट्रीय गीताचे गायन होत असे. परंतु, हे गायन बंद करण्याचे आदेश कमलनाथ यांनी दिले होते. कर्मचाऱ्यांनी लोककल्याणकारी गोष्टींवर भर द्यायला हवा. देशभक्ती ही राष्ट्रीय गीत गायन करून दाखवायची गोष्ट नसून ती कर्मचाऱ्यांनी आपल्या कामातून दाखवावी असे त्यांनी म्हटले होते.

'वंदे मातरम्' बंद झाल्यानंतर भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला होता. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एकतर काँग्रेसला 'वंदे मातरम्' म्हणता येत नसेल किंवा राष्ट्रगीत गाण्याची त्यांना लाज वाटत असेल असा हल्लाही केला होता. तसेच काँग्रेसने 'वंदे मातरम्' म्हटले नाही तर वल्लभ भवनच्या आवारात जनतेसोबत मिळून मी महिन्याच्या प्रत्येक तारखेला 'वंदे मातरम्' म्हणेल असा इशाराही शिवराज सिंह यांनी दिला होता.

Web Title: Kamal Nath Takes U Turn On His Earlier Order, Civilians Will Also Sing National Song