esakal | कमलनाथ-सोनिया भेट; आघाडीबाबत चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

Sonia Gandhi and Kamalnath

कमलनाथ-सोनिया भेट; आघाडीबाबत चर्चा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamalnath) गुरुवारी काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना भेटले. उत्तर प्रदेशातील निवडणूकीसाठी समाजवादी पक्ष (Samajwadi Party) आणि बहुजन समाजवादी पक्ष (BSP) यांच्याशी युतीबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका वद्रा या सुद्धा तेव्हा उपस्थित होत्या. (Kamalnath Sonia Gandhi Meeting for Aghadi Discussion Politics)

उत्तर प्रदेशमधील दोन प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांबरोबर कमलनाथ यांचे फार चांगले संबंध असल्याचे मानले जाते. त्यांच्यासह युती करून भाजपसमोर आव्हान निर्माण करण्याचा काँग्रेस नेतृत्वाचा विचार आहे. २०१७ मध्ये काँग्रेस-सप अशी युती होती, मात्र त्यांना दारुण अपयश आले. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ३१२ जागांसह एकतर्फी बाजी मारली. दुसऱ्या क्रमांकावरील सपच्या खात्यात केवळ ४७ जागा होत्या, तर काँग्रेसला केवळ सात जागांवर विजय मिळाला.

हेही वाचा: लष्करी कर्मचारीच निघाला ‘घरचा भेदी’; ‘ISI’च्या हस्तकासह दोघांना अटक

यावेळी सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी युती करणार नसल्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसशिवाय बसपबरोबरही युती करण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. कोणत्याही मोठ्या पक्षांऐवजी छोट्या पक्षांबरोबर जाण्यास पसंती असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अध्यक्षपदी नियुक्तीची चर्चा

काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सध्या अनेक बैठका होत आहेत. विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार कमलनाथ यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. तशी घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.

loading image